‘नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतीय सैन्यातील महिलांची भूमिका वाढली आहे’ असे प्रतिपादन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. झाशी येथे संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र रक्षा समर्पण अभियान’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अमूल्य आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवार, १७ नोव्हेंबर २०२१ रोजी झाशी येथे तीन दिवसीय ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ चे उद्घाटन केले. १९ नोव्हेंबर रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीदिनी या उत्सवाची सांगता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित एका भव्य समारंभात संरक्षण मंत्रालयाच्या विविध नवीन उपक्रमांचे लोकार्पण करतील.
हे ही वाचा:
‘एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही एक ऐतिहासिक लढा लढत आहात’
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर फरार
मुंबईत हिवसाळा; दक्षिण मुंबईत पावसाने लावली जोरदार हजेरी
भालचंद्र शिरसाट यांच्या गच्छंतीसाठी पालिकेने केली एक कोटींची उधळपट्टी!
उद्घाटन प्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. तर हा महोत्सव म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय आणि दृढ निर्धाराचे एक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. तर सैन्य दलांमध्ये महिलांचे प्रमाण वाढावे रस्ताही सरकारने विशेष प्रयत्न केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दत्तरुद्ध झाल्यापासून सैन्य दलातील महिलांची भूमिका वाढली आहे असे त्यांनी संगितले.