त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. या विरोधात भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, ठाकरे सरकारकडून सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्याला रोखण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे @BJP4Maharashtra pic.twitter.com/1hH42Aw2EC
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 16, 2021
ठाकरे सरकारने हा आदेश दिलेला असला तरी सोमय्या मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम आहेत. रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या हिंदूंच्या दुकानांची तोडफोड झाली, व्यापारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या भेटीसाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचं पत्र सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवलं आहे. मात्र, अमरवाती पोलीस आयुक्तांनी अमरावती शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा असं सोमैय्यांना सांगितलं आहे. मात्र, सोमय्या दौऱ्यावर ठाम आहेत. आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा:
आंध्र प्रदेशात भाजपा लवकरच मोठी शक्ती बनेल
काय आहे पूर्वांचल एक्सप्रेसवेचे महत्व?
राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. राज्य सरकारने या घटनांची दखल घेत अमरावती येथे कलम १४४ लागू केले असून अजूनही परिसरातील इंटरनेट सेवा बंद आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही कालपासून १४४ लागू करण्यात आले आहे.