गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचारी हे एसटीचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी ठाम असून सरकारने मात्र यावर कठोर कारवाई करत काही एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबावे म्हणून पत्र लिहिले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य दखल घेतली जात नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे, असे चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच, पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे आडमुठेपणा करत व्हिलन बनत आहेत, असा खोचक टोलाही चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना लगावला आहे.
हे ही वाचा:
नागपूरनंतर सांगलीतही संचारबंदी लागू
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?
वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण
एसटी विलिनीकारणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट समोर आणली जाते. सुमारे ३५ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यांची मुलं पोरकी झाली आहेत. त्यांच्या पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरून येणार? माणसाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का? असे सवाल त्यांनी पत्राच्या माध्यमातून अजित पवार यांना विचारले आहेत.
माननीय ना.अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्यपत्रास कारण की…एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून @msrtcofficial चे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा…
चित्रा किशोर वाघ* pic.twitter.com/OWRZVZuR1C
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 16, 2021
अजित पवार यांनी स्वतः या विषयात लक्ष घातल्यास हे प्रकरण निकाली लागेल तसेच विलिनीकरण मागणीची त्वरित दखल घ्यावी असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात अजूनही कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलिनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.