शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच राज्यातील कोट्यवधी लोक शोकाकुल झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पुण्यातील पार्वती भागातील पुरंदरे वाडा या त्यांच्या निवासस्थानाजवळ शेकडो लोकांची गर्दी जमली. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यसाठी राज्यभरातून त्यांचे चाहते आणि इतिहासप्रेमी नागरिक हे पुण्याच्या दिशेने निघाले. तर अनेक मान्यवरांनीही त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थिती दर्शवली. या सर्व गर्दीचे नियोजन करण्याचे काम राष्त्री स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक करत होते.
पांढरा सादरा, तपकिरी विजार, आणि काळी टोपी अशा गणवेषातले संघाचे स्वयंसेवक पुरंदरे वाड्याच्या परिसरात सकाळपासूनच उपस्थित होते. दीनानाथ रुग्णालयातून बाबासाहेबांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. तेव्हा त्यांचे अंत्यदर्शन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे, नागरिकांची गर्दी न नियंत्रणाबाहेर जाऊ नये, प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते.
हे ही वाचा:
अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया
‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’
पुरंदरे वाड्याबाहेर स्वयंसेवक तैनात होते. तर बाबासाहेबांच्या पार्थिवाच्या शेजारीही गणवेशधारी संघ स्वयंसेवक उभे होते . बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना शिस्तीने एका रांगेतून सोडण्याचे काम ते करत होते. तर बाबासाहेबांवर ज्या वैकुंठ स्मशानभूमीत संस्कार झाले तिथेही हे स्वयंससेवक उपस्थित होते आणि गर्दीचे नियोजन आणि अन्य व्यवस्था बघत होते.
बाबासाहेब पुरंदरे हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमध्ये घडलेले एक स्वयंसेवक होते. त्यामुळे संघ स्वयंसमसेवकांसाठीही हा एक दुःखद क्षण असून त्यांच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याने जगाचा निरोप घेतल्याची भावना होती.