पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झारखंडमधील रांची येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थोर आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ संग्रहालयाचे उद्घाटन केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या इच्छाशक्तीमुळे झारखंड राज्य अस्तित्वात आले आणि झारखंड आज स्थापना दिवस साजरा करत आहे. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयींनी नव्हे तर आदिवासी कार्य मंत्रालयाची निर्मिती आदिवासींच्या हितासाठी केली होती.
“माझ्या आयुष्याचा मोठा भाग मी आदिवासी बांधव, भगिनी आणि मुलांसोबत घालवला आहे. त्यांच्या सुख-दुःखाचा, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि जीवनातील गरजांचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे वैयक्तिकरित्याही आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे.” असं मोदी म्हणाले. “काही दिवसांपूर्वी मी प्रत्येक राज्यात आदिवासी संग्रहालये स्थापन करण्याचे आवाहन केले होते.” असंही मोदी म्हणाले.
केंद्र सरकारसह प्रत्येक राज्य या दिशेने वाटचाल करत आहे याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, लवकरच आणखी नऊ राज्यांमध्ये आदिवासी संग्रहालये उभारली जातील. १५ नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय
अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते
हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मोदींनी ट्विट केले की, ”भगवान बिरसा मुंडाजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य चळवळीला धार देण्याबरोबरच त्यांनी आदिवासी समाजाच्या हिताच्या रक्षणासाठी नेहमीच संघर्ष केला. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म १८७५ मध्ये अविभाजित बिहारच्या आदिवासी भागात झाला. त्यांनी आदिवासींना ब्रिटीश वसाहतवादी राजवट आणि धर्मांतराच्या कारवायांविरुद्ध एकत्र केले. १९०० साली रांची तुरुंगात मुंडा यांचा मृत्यू झाला.