शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला आहे. वयाच्या १०० व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात असून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद असल्याचे म्हटले आहे. तर एका दिव्यदृष्टीचा दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे असे गडकरी यांनी म्हटले आहे.
मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. असा शिवशाहीर होणे नाही असे म्हणत त्यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
सीबीआय, ईडी प्रमुखांचा कार्यकाळ वाढणार
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
तर पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली
“वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५:०७ वा. प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” असे ट्विट मोहोळ यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाबासाहेब यांचे जाणे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे असे म्हटले आहे.तर बाबासाहेब पुरंदरेंच्या जाण्याचे वृत्त अतिशय दुःखद असल्याचे चित्र वाघ यांनी म्हटले आहे.
बाबासाहेब पुरंदरे याचे पार्थिव सकाळी ८.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. तर सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशान भूमीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.