रमाबाई नगर येथील नाल्यात एक नवजात अर्भक सापडले असून पोलिसांनी त्या अर्भकाला वाचविले आहे. या बालकाला त्या नाल्यात कुणी टाकले याची माहिती पोलिस घेत आहेत.
रविवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्व प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला की,रमाबाई नगर येथील नाल्यात एका स्री जातीचे बालकास टाकून देण्यात आलेले आहे. सदरचा संदेश प्राप्त होताच रात्रपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पंतनगर निर्भया मोबाईल तसेच पंतनगर बीट मार्शल ४ तसेच पोलीस उप निरीक्षक गायकवाड व पथक यांचेसह तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
नमूद ठिकाणी रमाबाई नगर,नाल्या जवळ एक स्री जातीचे नवजात बालक कपड्यात गुंडाळलेले जिवंत अवस्थेत सापडले. नमूद घटनास्थळी सुरेंद्र विनायक रणपिसे हे हजर होते. त्यांनी राहात्या घराजवळ मांजराचा जोरजोरात आवाज येत असल्याने बाहेर येऊन पाहिले असता जवळच असलेल्या नाल्यामधून बालकाचा आवाज येत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन पाहिल्यावर कपड्यात गुंडाळलेले एक बालक आढळून आले. नंतर त्यांनी नियंत्रण कक्षास सदर माहिती कळविली.
घटनास्थळी नमूद नवजात बालकाबाबत जुजबी चौकशी केली.परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर नमूद नवजात बालक पंतनगर निर्भया मोबाईल कर्तव्यावर WPC सोनावणे, ASI पारधी. पो.हवा.यादव यांच्या ताब्यात देवून राजावाडी हॉस्पिटल,घाटकोपर याठिकाणी औषधोपचार व पुढील सोपस्कार करण्यासाठी पाठविले.
हे ही वाचा:
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक
अभिनेते विक्रम गोखलेंचे बिनधास्त बोल; देश हिरवा नको, भगवाच राहिला पाहिजे!
किवी विरुद्ध कांगारू सामन्यात कोणाची होणार सरशी?
नमूद पंतनगर निर्भया पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली व त्यानंतर बालकाला ताब्यात घेवून राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी औषधोपचार दिलेने नमूद नवजात बालकांचे प्राण वाचवून जीवनदान दिलेले आहे. नमूद घटने संदर्भात पंतनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.