ईशान्य भारतातील परिस्थिती आता आटोक्यात आल्याने, भारतीय सैनिक या भागात गुंतलेले १० हजार सैनिक उत्तर सीमेवर उद्भवलेल्या प्रसंगाला हाताळण्यासाठी पाठवण्यास सुरूवात करणार आहे. या सीमेवर सध्या चीनसोबत तणावग्रस्त संबंध निर्माण झाले आहेत.
हे सैनिक नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सहाय्य करण्याचे आहे. सध्याच्या तणावपूर्ण काळात आघाडीवरच्या सैनिकांना यामुळे मोठे सहाय्य मिळणार आहे. यापूर्वीच ईशान्य भारतातून तीन हजार सैनिकांना उत्तर सीमेवर हलविण्यात आले आहे. यापुढच्या काळात साधारणपणे टप्प्याटप्प्याने सात हजार सैनिक या वर्षाच्या अखेरपर्यंत उत्तर सीमेवर हलवण्यात येतील. ईशान्य भारतात सैन्याचा वापर घुसखोरी रोखणे आणि आतंकवादाविरूद्ध लढण्यासाठी करण्यात गेला. कारगिल रिव्ह्यु कमिटीने फेब्रुवारी २००० मध्ये दिलेल्या अहवालानुसार, या दोन कामांत सैन्याचा सातत्याने वापर केल्याने, सैन्याचे त्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून लक्ष भरकटते. ईशान्य भारतातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. आता तेथील स्थानिक पोलिस ही परिस्थिती हाताळू शकत असल्याने तेथील सैन्य कमी करण्यात येणार आहे.
हे ही वाचा: लडाखमध्ये लवकरच जलदगस्ती नौका
भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, ईशान्य भारतातील सैन्य हलवण्यात येत आहे. मात्र जम्मू आणि काश्मिरमधील सैन्य हलवण्यात येणार नसल्याचे त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
सैन्याच्या नॉर्दन कमांडचे निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सुरक्षा आता बरीच काबूत आली आहे. त्यामुळे सैन्य सीमेवर तैनात केल्यास, तिथल्या सैन्यासाठी ती मोठी मदत ठरेल.
भारतीय सैन्याने ईशान्य भारतात, उत्तम कामगिरी करून बंडखोरांचा बराच बिमोड केला आहे. म्यानमारसारख्या देशाचे सहाय्य लाभल्याने बंडखोरांसाठी त्यांच्या कारवाया अवघड झाल्या आहेत.