शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भारत सरकारतर्फे गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात १२ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यात ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील पहिलेवहिले सुवर्णपदक घेऊन येणाऱ्या नीरज चोप्रा याला भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्थात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर त्याच्यासोबतच महिला क्रिकेटपटू आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, हॉकी संघाचे कर्णधार मनप्रीत सिंह आणि गोलकीपर पि. आर. श्रीजेस यांचाही समावेश आहे. तर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यालादेखील खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कार मिळणारा छेत्री हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.
हे ही वाचा:
नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा?
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका
खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप हे एक पदक, सन्मानपत्र आणि रोख रुपये पंचवीस लाख अशा स्वरूपाचे आहे. तर अर्जुन पुरस्कार म्हणून एक कांस्य प्रतिमा, सन्मानपत्र आणि रोख १५ लाख रुपये देण्यात येतात. दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी म्हणजेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी हा सोहळा पार पडतो. पण यंदा या कालावधीत ऑलिम्पिक आणि परालिम्पिक स्पर्धा सुरू असल्यामुळे आणि या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करायचा असल्यामुळे पुरस्कार सोहळ्याची तारीख बदलण्यात आली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, माजी क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त खेळाडूंची सूची खालीलप्रमाणे आहे
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार: नीरज चोपरा (ऐथलेटिक्स), रवि कुमार (कुश्ती), लवलीना बोरगोहेन (मुक्केबाजी), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनि लेखारा (पैरा शूटिंग), सुमित अंतिल (पैरा ऐथलेटिक्स), प्रमोद भगत (पैरा बैडमिंटन), कृष्णा नागर (पैरा बैडमिंटन), मनीष नरवाल (पैरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी)
अर्जुन पुरस्कार: अरपिंदर सिंह (ऐथलेटिक्स), सिमरनजीत कौर (मुक्केबाजी), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखंब), अभिषेक वर्मा (निशानेबाजी), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुश्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी)), बीरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पैरा ऐथलेटिक्स), निषाद कुमार (पैरा ऐथलेटिक्स), प्रवीण कुमार (पैरा ऐथलेटिक्स), सुहाश यतिराज (पैरा बैडमिंटन), सिंहराज अधाना (पैरा निशानेबाजी), भावना पटेल (पैरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पैरा तीरंदाजी) और शरद कुमार (पैरा ऐथलेटिक्स)