आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र लिहून केली मागणी
नांदेड, अमरावती, मालेगावमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर झालेली हिंसा, तोडफोड, दगडफेक यानंतर या संघटनेविरोधात संतापाचे वातावरण पसरले असून या संघटनेचा पूर्वतिहास पाहता त्यांच्यावर बंदी कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या रझा अकादमीवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी असे आमदार भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, जातीयतेचे विष पेरण्याचे काम करणाऱ्या रझा अकादमीवर ताबडतोब कारवाई करावी आणि बंदी घालावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नांदेड, मालेगाव, अमरावती त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेसाठी मोर्चे काढून सर्वसामान्य लोकांच्या घरांची दुकानांची जाळपोळ केलीच शिवाय, पोलिस अधिकाऱ्यांना जखमी केले. या संघटनेवर बंदी घालावी. २०१२लाही त्यांनी असेच केले. कोविड काळातही फ्रान्ससंदर्भात त्यांनी अशीच निदर्शने केली होती. त्या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. रझा अकादमीविरोधात आपण अशीच मागणी २०१२मध्ये केली होती.
हे ही वाचा:
हे बलिदान कधीही विसरता येणार नाही
परमबीर यांना फरार घोषित करण्यासाठी क्राइम ब्रँचचा अर्ज
लसीकरण मोहिमेत मुंबईला ‘१०० टक्के’ गुण!
अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी केला बलात्कार
त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेसाठी महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात रझा अकादमीने आंदोलने केली आणि त्याला हिंसक वळण लागून दुकाने,घरे यांची तोडफोड, दगडफेक केली गेली. त्यामुळे आता रझा अकादमीविरोधात महाराष्ट्रात रोष आहे.
‘धार्मिक दंगली घडविणाऱ्या रजा अकादमीवर कठोर कारवाई करण्यासोबतच कायमची बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे. ते ही हिंमत दाखवतील अशी अपेक्षा आहे. pic.twitter.com/PdVFsna5yU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 13, 2021