आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात
अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिमांनी केलेल्या हिंसक आंदोलनावर बोलताना राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने ते आंदोलन अल्पसंख्याक समाजाचे असल्यामुळे कारवाई न करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दिले असणार असा घणाघात भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला.
जय महाराष्ट्र या वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, अमरावतीतील भाजपाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागता कामा नये हे खरे, पण रझा अकादमीने आदल्या दिवशी काढलेल्या मोर्चात पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी शून्य कारवाई केली. कारण पोलिसांना वरून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचे आदेश असणार. कारण दंगेखोर अल्पसंख्याक समाजाचे आंदोलक आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता हातावर हात ठेवून आणि पायावर पाय ठेवून बसा. पण याची प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटणारच आहे. बंदला लोकानी पाठिंबा दिला. आता ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले तेच लोक पोलिसांवर हल्ले करून समाजविघात घटना घडवत आहेत.
हे प्रकरण भाजपाने चिघळवले या राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार भातखळकर म्हणाले की, चव्हाण आणखी काय बोलणार? कारण त्यांचे पोलिस खंडण्या गोळा करत आहेत, बॉम्ब ठेवत आहेत. गृहमंत्री तर फरार झाले आणि आता तुरुंगात आहेत. राष्ट्रवादी तर मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे खापर भाजपावर फोडत राहायचं. हे यांचे जुने धंदे आहेत. मुख्यमंत्री यांचे, राज्य सरकार यांचे, पोलिस यांचे, गृहमंत्री याचे तरीही प्रत्येक गोष्टीसाठी भाजपाचे नाव घ्यायचे. हे अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. कायदा आणि सुव्यवस्था मुस्लिमांचे लांगुलचालन करत असल्यामुळे रसाताळाला पोहोचली आहे.
हे ही वाचा:
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका
चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज
भातखळकर यांनी सांगितले की, माझा प्रश्न आज एवढाच आहे की, रझा अकादमीने मोर्चा काढल्यावर पोलिसांवर दगडफेक होते तेव्हा हे का बोलले नाहीत? किती रझा अकादमीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. काल गृहमंत्र्यांनी निवेदन काढले. हिंदु समाजाने शांतता राखावी. हिंदु समाजाचा प्रश्चन आला नव्हता. यांचे गुप्तचर खाते काय झोपले होते. याच रझा अकादमीने पोलिसांवर गोळीबार केला होता व पोलिसांच्या हुतात्मा स्मारकाची तोडफोड केली होती.