महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड, अमरावती येथे मुस्लिमांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला हिंसक वळण लागल्यावर त्याचे खापर शिवसेनेने भाजपावर फोडले आहे. पण रजा अकादमीशी शिवसेनेचेच कसे जवळचे संबंध आहेत, हे भाजपाचे पालिकेतील स्थायी समितीतील सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उघड केले आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेचा रंग बदलला आहे, हा घ्या पुरावा.. आझाद मैदान दंगलीनंतर रझा अकादमीला सरकारच्या आसपासही फिरकू दिलं जात नव्हते. मात्र मविआ सरकार सत्तेत आल्यावर याच रझा अकादमीच्या मोईन मियाँला पोलीस आयुक्तालयात बोलावून उद्धव ठाकरे भेटले. शेजारी बसवलं त्याच्याकडून फुलं स्वीकारली!
या ट्विटमध्ये रझा अकादमीच्या नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली भेट, त्यांचे केलेले कौतुक यासंदर्भातील छायाचित्रेही जोडली आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊत यांनी रजा अकादमीचे खापर फोडले भाजपावर
चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज
शाकाहाराच्या पुरस्कारामुळे महापौरांवर मांसाहारी वैतागले
सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार
रझा अकादमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सातत्याने वादात असलेल्या या संघटनेने आता त्रिपुरातील कथित मशिद तोडफोड प्रकरणाच्या अफवेनंतर मालेगावात आंदोलन केले. पण ते आंदोलन न राहता त्यात दुकानांची तोडफोड, दगडफेक झाली आणि आंदोलन हिंसक बनले. त्यात पोलिसही जखमी झाले. रझा अकादमीचा अशा वादविवादांचा इतिहास राहिलेला आहे. या घटनेनंतर त्याचे खापर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावरच फोडले आहे पण या रझा अकादमीकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच फुले स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेनेची यासंदर्भातील भूमिका काय असेल असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवसेनेचा रंग बदलला आहे,
हा घ्या पुरावा..
आझाद मैदान दंगलीनंतर रझा अकादमीला सरकारच्या आसपासही फिरकू दिलं जात नव्हते. मात्र मविआ सरकार सत्तेत आल्यावर याच रझा अकादमीच्या मोईन मियाँला पोलीस आयुक्तालयात बोलावून उद्धव ठाकरे भेटले. शेजारी बसवलं त्याच्याकडून फुलं स्वीकारली!@Dev_Fadnavis pic.twitter.com/vVwtqe5nyc— BHALCHANDRA SHIRSAT (@bmshirsat) November 13, 2021