त्रिपुरात झालेल्या कथित दंगलीनंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात रजा अकादमीने केलेल्या उच्छादामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचे खापर भाजपावर फोडले आहे. रजा अकादमी संघटनेद्वारे ज्या दंगली घडविण्यात येत आहेत, त्यामागे कोणता पक्ष हे हे सर्वांना ठाऊक आहे. अनेक वर्षांपासून भाजपा या संघटनेला खतपाणी घालत असून रजा अकादमी हे भाजपाचेच पिल्लू आहे असे म्हणते महाराष्ट्रातील असंतोषाची जबाबदारी राऊत यांनी भाजपावर लोटली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नासाठी केंद्राकडे बोट दाखविले जात असताना आता या आंदोलनांना भाजपाच कारणीभूत असल्याचा शोध संजय राऊत यांनी लावला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
त्रिपुरात मशिद पाडल्याच्या अफवेनंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. ही घटना बरेच दिवस आधी घडलेली असली तरी आताच महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे रजा अकादमी आणि इतर मुस्लिम संघटनांनी आंदोलन करत वातावरण प्रक्षुब्ध केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागून अनेक दुकानांची तोडफोड झाली, दगडफेक झाली आणि त्यात पोलिस जखमीही झाले. पण आता ती अकादमी भाजपाचेच एक अंग असल्याचे राऊत म्हणत आहेत.
राऊत यांनी असाही शोध लावला की, रजा अकादमीला भाजपाचाच पाठिंबा असल्याने त्याचे लोण महाराष्ट्रात पसरले. अन्यथा, त्रिपुरात घडलेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे कारण काय?
हे ही वाचा:
दंगल भडकावण्यामागे शिवसेना नेते अर्जुन खोतकर?
मुंबई महानगरपालिकेत २५ वार्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार
दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले
त्रिपुरातील घटनेच्या अफवांमुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत आंदोलने झाली आणि नंतर त्याला हिंसक वळण लागले. जमाव पोलिसांवरच धावून आला. महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यातील मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रामुख्याने निषेधाची आंदोलन करण्यात आली आणि पोलिसांवर हल्लेही झाले. त्यात पोलिस जखमी झाल्याचा प्रकारही घडला. रजा अकादमीने मुंबईतही असाच गोंधळ काही वर्षांपूर्वी घातला होता. त्यात दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मृतीस्थळाची तोडफोडही करण्यात आली होती आणि महिला पोलिसांवर हात टाकण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली होती.