राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. सिल्वर ओक येथे ही बैठक पार पडत असून या भेटीनंतर संपाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता सात दिवस झाले असून कर्मचारी त्यांच्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. विलिनीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती.
हे ही वाचा:
आता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार
…तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र LACवर कसे नेणार?
सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर
न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?
मुख्यमंत्री हे सध्या रुग्णालयात असल्यामुळे अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांसाठी कोणता निर्णय घेण्यात येणार याकडे लक्ष असणार आहे.
राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या वतीने सरकारशी चर्चा करणार परंतु कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून नयेत असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. कालच्या भेटीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती.