भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी न्यूज डंकाच्या ‘सुशासन पर्व’ या दसरा-दिवाळी अंकाचे कौतुक केले आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील राजकीय कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण झाली. त्यावरच न्यूज डंकाचा हा दसरा-दिवाळी अंक बेतलेला आहे. ‘न्यूज डंका’ चे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर यांनी दिवाळी अंकाची प्रत राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना दिली. या दिवाळी अंकाची संकल्पना आणि मान्यवरांचे लेख या सर्वच गोष्टी नड्डा यांना पसंतीस पडल्या आहेत.
पंतप्रधान मा.@narendramodi यांच्या दोन दशकांच्या प्रशासकीय कारकीर्दीवर बेतलेल्या @NewsDanka च्या "सुशासन पर्व' या हिंदी दिवाळी अंकाची प्रत आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.@JPNadda यांच्या हाती ही गेली. दिवाळी अंकाच्या सजावट मांडणी आणि दर्जाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. pic.twitter.com/ViSE175Lpf
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 12, 2021
तर नड्डा यांच्या सोबतच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना देखील ‘न्यूज डंका’ चा हा दसरा दिवाळी अंक भेट देण्यात आला. त्यांनी देखील ‘न्यूज डंका’ च्या या अभिनव उपक्रमाची प्रशंसा केली असून ‘न्यूज डंका’ ला शुभेच्छा दिल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa यांची आज अभ्यासवर्गानिमित्त म्हाळगी प्रबोधिनीत भेट झाली. @NewsDanka चा पंतप्रधान @narendramodi
यांच्या दोन दशकांच्या कारकीर्दीवर आधारित 'सुशासन पर्व' हा हिंदी दिवाळी अंक त्यांना भेट दिला. pic.twitter.com/Ox8w5HzuZq— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 12, 2021
हे ही वाचा:
‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’
एसटीचे विलिनीकरण झाले तर वसुली कशी होईल?
महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार
वक्फ बोर्डाशी संबंधितांवर छापेमारी होताच मलिकांचा मंदिर घोटाळ्याचा आरोप
‘न्यूज डंका’ च्या या दसरा-दिवाळी अंकात वाचकांसाठी दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लेखांची मेजवानी असणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिग्गज मंडळींनी या अंकासाठी लिखाण केले आहे. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा या अंकातून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच संसदीय राजकारणात २० वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. या दोन दशकांच्या कामगिरीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण या दिवाळी अंकात वाचायला मिळणार आहे.
‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी आणि सल्लागार संपादक अतुल भातखळकर यांच्या सह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, केंद्रीय मंत्री भारती पवार, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, उदय माहूरकर, रणजीत सावरकर, ऑलिम्पिकपटू अंजली भागवत, चंपत राय, नितीन गोखले, डॉ.निलीमा क्षीरसागर अशा अनेक धुरंदरांचे लेख असणार आहेत. या दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये ‘न्यूज डंका’ चे मार्गदर्शक असणारे प्रशांत कारूळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.