न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वरिष्ठ निवड समितीने संघाची निवड केली आहे. अजिंक्य रहाणेकडे पहिल्या कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
नवनियुक्त टी-२० कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना बीसीसीआयच्या वर्कलोड व्यवस्थापन धोरणाचा भाग म्हणून विश्रांती देण्यात आली आहे.
#TeamIndia squad for NZ Tests:
A Rahane (C), C Pujara (VC), KL Rahul, M Agarwal, S Gill, S Iyer, W Saha (WK), KS Bharat (WK), R Jadeja, R Ashwin, A Patel, J Yadav, I Sharma, U Yadav, Md Siraj, P Krishna
*Virat Kohli will join the squad for the 2nd Test and will lead the team. pic.twitter.com/FqU7xdHpjQ
— BCCI (@BCCI) November 12, 2021
“विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील होईल आणि संघाचे नेतृत्व करेल.” असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने ऑफस्पिनर जयंत यादवसह कसोटी संघात पुनरागमन केले.
भारत न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० (१७,१९ आणि २१ नोव्हेंबर) आणि दोन कसोटी (२५-२९ नोव्हेंबर आणि ३-७ डिसेंबर) खेळणार आहे. पहिली कसोटी कानपूर येथे तर दुसरी कसोटी मुंबई येथे होणार आहे.
हे ही वाचा:
खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप
उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट
नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या विराट कोहलीला विश्रांती देऊन या मालिकेसाठी संघाची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे इतर खेळाडू वगळण्यात आले आहेत. टीम इंडियाच्या निराशाजनक खेळानंतर लगेचच संघाची घोषणा झाल्यामुळे त्यांना टी-२० विश्वचषकातून बाहेर पडताना, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची बरीच चर्चा होती.