राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा नवे आरोप केले आहेत. शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा सरकार असताना एका मंत्र्याने मंदिर जमिनीशी संबंधित एक घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. पण हा आरोप करतानाही त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. विशेष म्हणजे वक्फ बोर्डाशी संबंधित व्यक्तींच्या कार्यालयांवर छापे पडल्यावर मलिकांनी हे आरोप केले आहेत.
ईडीचे छापे हे वक्फ बोर्डावर पडले नसून त्याच्याशी संबंधीत व्यक्तींवर पडले आहेत असा खुलासा नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत केला. ईडीने केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो असे मलिक यांनी सांगितले. तर याचवेळी भाजपाचे सरकार असताना एका मंत्र्याने मंदिराच्या जमिन व्यवहारात घोटाळा केला असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तर या संबंधीचे पुरावे लवकरच आपण देऊ असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार
कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी
‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’
आज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा
तर याचवेळी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या सुरात सूर मिसळत अभिनेत्री कंगना रानौतवर हल्लाबोल केला आहे. “लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है!” असे म्हणत मलिक यांनी कंगना रानौतवर निशाणा साधला आहे. कंगना हिला दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तर कंगनावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.