जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत एका हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चावलागाम परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलिसांनी दिली आहे.
2 Hizbul Mujahideen terrorists killed by security forces in ongoing encounter in J-K's Kulgam
Read @ANI Story | https://t.co/AHCdJ2ebvr#JammuAndKashmir pic.twitter.com/0MQsSGr9xE
— ANI Digital (@ani_digital) November 12, 2021
ठार कऱण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या दोन इतकी झाली आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अद्याप परिसरात दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्यामुळे परिसरात अजूनही शोध सुरू आहे.
हे ही वाचा:
खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप
उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट
नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे शिराझ मोलवी आणि यावर भट असून ते हिजबुल मुजाहिद्दीनचे जिल्हा कमांडर असल्याचे वृत्त आहे. शिराझ हा २०१६ पासून सक्रीय होता. अनेक घातपाताच्या कारवाया आणि नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. शिराझला कंठस्नान घातले हे सुरक्षा दलाचे मोठे यश असल्याचे काश्मिरचे पोलिस महानिरिक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे.