29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामामुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटीची माहिती गुलदस्त्यात

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटीची माहिती गुलदस्त्यात

Google News Follow

Related

प्रत्येक वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे जप्त मुद्देमालाचे अखेर काय केले जाते आणि याची विल्हेवाट लावली जाते की नाही? हा प्रश्न उपस्थित होत असतो. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मागील ३ वर्षात ३४१४ किलो मुद्देमाल जप्त केला असून यांपैकी २०२१ साली जप्त केलेल्या २५९३ किलो पैकी फक्त २४८ किलो गांजा, एमडी आणि कोडेन याची विल्हेवाट लावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली असून अन्य मालाची माहिती गुलदस्त्यात आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील 3 वर्षात जप्त केलेला मुद्देमाल आणि विल्हेवाटची माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अनिल गलगली यांस वर्ष २०१९, वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. वर्ष २०१९ मध्ये २५.२८ कोटींचा ३९५ किलो ३५ ग्रॅम माल तसेच १३४३ स्ट्रीप्स, ७५७७ बॉटल्स, १५५१ डॉट जप्त केला. पण या मालाची विल्हेवाट बाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.

वर्ष २०२० मध्ये २२.२३ कोटींचा ४२७ किलो २७७ ग्रॅम माल तसेच १४ मिली ग्राम, ५१९१ बॉटल्स, ६६००० टॅब जप्त करण्यात आला होता. या मालाची विल्हेवाट लावली की नाही? याचीही माहिती दिली नाही. तर २०२१ च्या २५ ऑक्टोबर पर्यंत ८३.१८ कोटींचा सर्वाधिक माल जप्त करण्यात आला ज्यात २५९२ किलो ९३ ग्रॅम माल तसेच १५८३० बॉटल्स,१८९ एलएसडी पेपर्स चा समावेश होता. विल्हेवाट लावलेल्या मुद्देमालात गांजा २४८ किलो ३४४ ग्राम, एमडी ०.०१० किलो ग्रॅम आणि ३६८ कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरप बॉटल्स आहे.

 

हे ही वाचा:

बांद्रयाच्या खेरवाडीत भीषण आग

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?

 

अनिल गलगली यांच्या मते वर्ष २०१९ आणि वर्ष २०२० ची माहिती दिलीच नाही आणि २०२१ मध्ये २४८ किलो मालाची लावलेल्या विल्हेवाटची माहिती दिली आहे. याबाबतीत आजही शंका असते आणि चर्चाही असते की पोलिस अधिकारी जप्त माल परस्पर विकतात आणि मोहास बळी पडतात. यासाठी प्रत्येक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे जेणेकरून अंमली पदार्थाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईत सामान्य मुंबईकर सुद्धा आपले योगदान देईल, या आशयाचे पत्र अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांस पाठविले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा