केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरुद्धच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दररोज ५०० शेतकरी संसदेकडे ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होतील. असे संयुक्त किसान मोर्चाने (SKM) मंगळवारी सांगितले.
दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त SKM ने २६ नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांच्या राजधानीत मोठ्या प्रमाणात महापंचायतींचे आवाहन केले आहे. त्या दिवशी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमधील शेतकरी महापंचायतींमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर जमतील.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी या कायद्यांच्या विरोधात अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू केले होते. या कायद्यांना नंतर जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी दिल्ली सीमेवर,सिंघू सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी एक बैठक घेतली आणि नंतर घोषणा केली की ते २६ नोव्हेंबर रोजी आणि नंतर संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे एक वर्ष पाळतील.
“२९ नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत, ५०० निवडक शेतकरी दररोज ट्रॅक्टर ट्रॉलीमधून संसदेकडे जातील.” असे शेतकरी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याआधी मार्चमध्येही शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी संसदेवर पायी मोर्चा काढला होता.
हे ही वाचा:
अनियंत्रित परदेशी देणग्यांचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये
रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच
३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय
पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी
२६ जानेवारी रोजी अशाच प्रकारे झालेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले होते, सुरक्षा कर्मचार्यांवर हल्ला केला होता आणि लाल किल्ल्यावर हल्ला केला, जिथे त्यांनी धार्मिक झेंडाही फडकावला होता.