अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा
भारतीय निवड समितीतर्फे आगामी न्यूझीलंड सोबतच्या टी२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अपेक्षेप्रमाणे कर्णधारपदाची धुरा सलामीवीर रोहित शर्मा याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर सलामीचा त्याचा साथीदार के. एल. राहुल याला उपकर्णधार घोषित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राहुल द्रविड याची ही पहिली मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या न्यूझीलंड दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूझीलंड सोबतच्या या बहुप्रतीक्षित मालिकेसाठी मंगळवार ९ नोव्हेंबर रोजी संघ घोषित करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली याच्या सोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या सारख्या अष्टपैलू खेळाडूंनाही विश्रांती दिलेली आहे. या मालिकेसाठी काही तरुण आणि नव्या चेहऱ्यांचा समावेश या संघात होताना दिसत आहे. त्यासोबतच काही जुनी चेहरेही कमबॅक करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले
वरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू
साहित्य संमेलनगीतात सावरकरांना स्थान का नाही?
जनधन खाती वाढली आणि गुन्हे घटले!
भारतीय संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
१७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड संघाचा भारत दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यामध्ये तीन टी-२० सामने आणि दोन कसोटी सामन्यांच्या समावेश आहे. १७, १९ आणि २१ नोव्हेंबर अशा तीन दिवशी टी-२० सामने खेळले जाणार आहेत. तर त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यापैकी पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत कानपूर मध्ये ठेवला जाणार आहे. तर ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या काळात मुंबईच्या वानखेडे मैदानावर दुसरी कसोटी खेळली जाईल.