देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींसह जमीन व्यवहार केल्याचा आरोप केल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले. फडणवीसांच्या आरोपांना मलिकांनी आरोपांनी प्रत्युत्तर दिले. पण मलिकांच्या या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी नवाब मलिकांवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.
‘नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेल्या सगळ्या आरोपांवर ‘कबुल है’ म्हटले आहे’ असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तर हसीना पारकर सोबतचे संबंध स्वीकारू शकत नाही म्हणून त्यांनी मूक संमती दर्शवली असे आशिष शेलार यांनी सांगितले. फडणवीस यांचा बॉम्ब भिजलेला आहे हे सांगताना मलिक यांचा चेहरा घामाने भिजलेला दिसत होता असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी सलीम पटेल आणि शहावली कडून जमीन खरेदी केल्याचे कबुल केले. ही जमीन बाजार भावापेक्षा कमी किंमतीत विकत घेतली गेली. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली, हे स्वतः नवाब मलिक यांनी कबूल केलंय. एका वॉचमनला कुठलाही व्यवहार न करता जागेवर नाव नोंदणी कशी करू शकतो. संपूर्ण इमारत कमी किमतीत भाड्याने मिळते? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
नवाब मलिक कुटुंबाला कशी मिळाली ३ एकरची जमीन अवघ्या ३० लाखाला
‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’
‘अनिल परब हे परिवहन मंत्री नव्हे ठाकरे परिवार मंत्री’
तर नवाब मलिक राज्यातील सामान्य जनतेला मूर्ख समजतात का? सरकारच्या रेडिरेकनर दराच्या खाली त्यांना जागा कशी काय मिळाली ? मलिक सांगतात ते तिथे भाडेकरू होते. मग ठाकरे सरकारने असा एक जी.आर काढावा आणि सर्व भाडेकरूंना कवडीमोल भावात जागेचे मालकी हक्क मिळवून द्यावेत असे शेलार यांनी म्हटले आहे.