पालघर जिल्ह्यातील वसई येथे रांगोळीचे प्रदर्शन भरले होते यामध्ये वसई आणि आजूबाजूच्या परिसरातील कलाकारांनी त्यांची रांगोळीची कला या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समोर आणली. वसईच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
कोरोना काळातील जीवन, दुःख याचे वर्णन करणाऱ्या रांगोळ्या कलाकारांनी काढल्या होत्या. तसेच पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, रांगोळी काढतानाची रांगोळी, टू डायमेंशन, थ्री डायमेंशन, व्यक्तिचित्र रांगोळी अशा विविध रांगोळ्या कलाकारांनी काढल्या होत्या.
हे ही वाचा:
कोका- कोला ‘थंड’ का झाला? महसुलात झाली मोठी घट
‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’
अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश
१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार
या प्रदर्शनात खास आकर्षण बनली ती रांगोळी म्हणजे दृष्टी भ्रम करणारी रांगोळी. या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने पाहिल्यास यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा चित्र दिसते, तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यास वाघाची प्रतिमा दिसते. ही रांगोळी जुईचंद्र गावात राहणाऱ्या हर्षद पाटील या तरुणाने रेखाटली आहे. एकाच रांगोळीत दिसणाऱ्या दोन प्रतिमांमुळे ही रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली होती. या रांगोळीला काढायला तब्बल २४ तास लागले होते.
वसईतील लोकांना वसईतील कलाकारांची ओळख व्हावी त्यांच्यातील कलागुण समजावे यासाठी हे प्रदर्शन भरवले असल्याचे आयोजकांनी सांगितले.