महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या जमिनीबाबत मंगळवारी ‘बॉम्ब’ फोडला, त्यातील ३ एकरची जमीन अवघ्या ३० लाखाला विकल्याचा आरोप पुराव्यांसह करण्यात आला आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही जमीन नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, कुर्ला येथे २.८० एकर जमीन ही १ लाख २३ हजार चौरस फूटची आहे. ही जागा एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार शहा वली खान व सलीम पटेल यांनी मिळून जमीन सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्राय लि. ला विकली आहे. नवाब मलिक यांच्या परिवाराची ही जमीन आहे. मी दिलेल्या कागदपत्रांत फराज मलिक यांची स्वाक्षरी आहे. सॉलिडसमध्ये नवाब मलिकही काही काळ होते. या जमिनीचा त्यावेळी रेट होता २०५३ प्रति चौरस फूट. रेडीरेकनरप्रमाणे ८५०० रु. आणि ही एवढी किमती जमीन अवघ्या अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून ३० लाखाला विकत घेतली गेली. त्यातले २० लाख देण्यात आले. त्यातले १० लाख शहा वली खान यांना मिळाले. तर सलीम पटेलची १५ लाखांची पावती आहे. या जमिनीची मूळ किंमत साडेतीन कोटी किंमत दाखविण्यात आली होती. २००३मध्ये जेव्हा या जमिनीचा सौदा सुरू झाला तो २००५ मध्ये संपला तेव्हा मलिक हे मंत्री होते.
हे ही वाचा:
‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’
‘अनिल परब हे परिवहन मंत्री नव्हे ठाकरे परिवार मंत्री’
१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार
फडणवीस म्हणाले की, नवाब मलिकांना माहीत नव्हते का की सलीम कोण ते. अशा गुन्हेगारांकडून जमीन का खरेदी केली? अशा गुन्हेगारांकडून ही जमीन घेताना ती २० लाखांत का दिली? मुख्य म्हणजे या सगळ्या गुन्हेगारांवर टाडा लावला होता. टाडाचा आरोपीची संपत्ती सरकार जप्त करते. मग या आरोपीची संपत्ती जप्त होऊ नये म्हणून मलिक यांना ती हस्तांतरित केली गेली का?