अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत केले विधान
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॉर्डिलिया क्रूझवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना बोलावण्यात आले होते, असे सांगितल्यानंतर शेख यांनी आपल्याला पार्टीसाठी बोलावणे होते, पण आपण तिथे गेलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टीकरण दिले.
ज्या काशिफ खानने आपल्याला बोलावले त्याला मी ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षड्यंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असा खुलासा अस्लम शेख यांनी केला.
मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याच्याशी माझे फोनवर बोलणे झाले नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. अनेक लोक लग्न, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं..
काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीएकडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचे निमंत्रण दिलं होतं. आता त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावे. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही. त्याने भेटून आमंत्रण दिलं होते हे मात्र नक्की, असं त्यांनी सांगितलं.
ज्या कार्यक्रमाला जात नाही त्याची माहिती घेतच नाही. दिवसभरात मला ५० लोक मला आमंत्रित करतात. एखाद्या लग्नात गेलो तर लोकं वाढदिवसाचंही निमंत्रण देत असतात. मी ज्या कार्यक्रमात जातो. त्याची माहिती घेत असतो. जिथे जातच नाही, त्याची माहिती घेत नाही. मला वाटतं ज्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याची माहिती घेणंही योग्य नाही, असंही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री बदलूनही सिद्धू विरुद्ध पंजाबचे मुख्यमंत्री मालिका सुरूच
‘अहमदनगरची दुर्घटना हे सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड’
हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी
कंगना, सिंधूसह १०२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
हे सांगतानाच अस्लम शेख यांनी एका मुलाला (आर्यन खानला) नशामुक्ती केंद्रात पाठवायला हवं होतं की नाही हे तपासायला हवं होतं. मीडियानेही तपास करायला हवा होता, असेही म्हटले आहे.