30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाहिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी

हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज कैरानामध्ये गेले. पश्चिम उत्तरप्रदेशातील शामलीमधील कैराना जे २०१७ सालच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक मुस्लिम गुन्हेगारी टोळ्यांमुळे हिंदू कुटुंबांच्या स्थलांतरामुळे चर्चेत होते. कैरानामध्ये ५० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१७ सालच्या निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला होता.

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भाजपाचे राज्य प्रमुख स्वतंत्र देव सिंह आणि पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या कैराना भेटीला २०२२ च्या निवडणुकांपूर्वी ६ महिन्यांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या मुद्द्याला पुन्हा जिवंत करण्याचा पक्षाचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि इतरांना २०१७ मध्ये भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर कैरानामध्ये परत आलेल्यांच्या कुटुंबियांशी भेटताना दाखवले.

“कैराना सारख्या ठिकाणांनी १९९० च्या दशकापासून राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि राजकारणात या गुन्हेगारांच्या सहभागाचे नकारात्मक परिणाम हाताळले आहेत. हिंदू व्यापारी आणि इतर हिंदूंना येथून स्थलांतरित होण्यास भाग पाडले गेले. यामुळे देशभरात ठळक बातम्या निर्माण झाल्या. २०१७ नंतर, आम्ही गुन्हेगारी विरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण लागू केले आणि येथे शांतता परत आली. अनेक कुटुंबे परतली आहेत.” यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना सांगितले.

“या आधीच्या समाजवादी पक्षाच्या राजवटीत ज्या कुटुंबांना इजा झाली होती. त्यांचे सदस्य येथे मारले गेले होते, त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.” असं योगी आदित्यनाथ म्हणाले, दोषींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांनी असेही जाहीर केले की सरकार पीडित कुटुंबांना भरपाई देईल जेणेकरून ते त्यांचे व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार पुन्हा चालू करू शकतील.

हे ही वाचा:

पंढरपूरला देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवू या!

मुख्यमंत्री बदलूनही सिद्धू विरुद्ध पंजाबचे मुख्यमंत्री मालिका सुरूच

दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान

कंगना, सिंधूसह १०२ मान्यवरांना पद्म पुरस्कार

मुख्यमंत्री म्हणाले की २०१७ मध्ये जेव्हा ते शहरात आले तेव्हा लोकांनी पोलिस चौकी आणि प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी बटालियनच्या बळकटीकरणाची मागणी केली होती. “चौकी मजबूत करण्याचे काम यापूर्वीच झाले आहे आणि आज मी येथे पीएसी बटालियन कॅम्पचा पाया घालण्यासाठी आलो आहे.” असं ते पुढे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा