28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाभारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून

भारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून

Google News Follow

Related

मुलानेच केली हत्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात सहभागी झालेले सैनिक नारायणराव साबळे यांचा त्यांच्या मुलानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड येथे घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात हा प्रकार घडला आहे.

लहुजी नगर येथे राहणारे नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलानेच मारहाण केली होती. यात दगडाचा जबर मार लागल्याने नारायणरावांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणराव साबळे यांनी १९६५ ते १९७१ या काळात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता.

नारायणराव लक्ष्मण साबळे यांच्यासह त्यांच्या मुलाचे जुन्या भांडणावरून बिनसले. ६ नोव्हेंबर रोजी हा राग मनात धरुन मुलगा विजय साबळे याने वडिलांना मारहाण केली. विजयची ४० वर्षीय पत्नी आणि १८ वर्षांचा मुलगा शुभम साबळे यांनीही मारहाणीत मदत केली.

विजयने वडिलांना बुक्क्यांनी मारले आणि दगडाने ठेचले. दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि त्यांच्या पत्नीने अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.

यासंदर्भात तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप साबळे यांनी यासंदर्भात फिर्याद केली असून त्यावरून विजय साबळे, शुभम साबळे, विजय साबळे यांची पत्नी या तिघांविरूद्ध कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

हे ही वाचा:

काय आहे श्री रामायण यात्रा?

त्रिपुरा ‘दंगलीं’प्रकरणी १०१ अकाउंटविरुद्द UAPA

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा कार्यकारिणीची महत्वाची बैठक

 

भारत पाकिस्तान युद्धामध्ये सैनिक नारायणराव साबळे यांचा सहभाग होता. या युद्धामध्ये त्यांच्या मांडीला एक गोळी लागली होती. यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा