पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने रस्त्यावरील पादचाऱ्यांना उडवण्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी एका पोलिस अधिकाऱ्याची आहे. तर या गाडीचा चालक देखील एक पोलिस अधिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या एका दांपत्याला या गाडीने धडक दिली असून या अपघातानंतर गाडीचा चालक गाडी तिथेच टाकून फरार झाला आहे.
या गाडीने बाईक स्वराला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचेही नुकसान झाले. गाडीचे एक चाक निखळून गेले. त्यानंतर ही गाडी तीन चाकांवर तब्बल १८ किलोमीटरचा प्रवास करत होती आणि ती ही भरधाव वेगाने. या सर्व गोंधळात या गाडीमुळे अनेक जण जखमी झाले आहेत. यापैकी प्रकृती एका इसमाची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात घडल्यानंतर या गाडीचा चालक गाडी तशीच टाकून एका भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे.
हे ही वाचा:
आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
विराट सेनेने स्कॉटलंडचा उडवला ८ विकेट्सनी धुव्वा
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
ही गाडी डहाणू पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. या अपघातानंतर गाडीचे चालक जरी पसार झाले असले तरी या गाडीत पोलिसांची टोपी सापडली आहे. त्यामुळे ही गाडी चालवणारी पोलिस अधिकारी असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात गाडीचे मालक सुहास खरमाटे यांच्या विरोधात वाणगाव येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.