क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास आता थेट एनसीबीच्या दिल्ली टीमकडून केला जाणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून ही केस काढून घेण्यात आली आहे. आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व केसेसचा तपास एनसीबीची दल्ली टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन यांनी दिली आहे.
आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
तर आपल्याला या केसमधून हटवलं गेलं नसून आपणच याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात यावा असं रीट पीटिशन दाखल केली होती असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.