28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणकेदारनाथचा 'हा' प्रश्न मार्गी लागला

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

Google News Follow

Related

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना केदारनाथमधील पुजाऱ्यांच्या निषेधाचा सामना करावा लागल्यानंतर दोन दिवसांनी, त्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या पुजाऱ्यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी मंदिराला भेट देऊन समस्या सोडवली. पंतप्रधान नरेंद्र यांच्या भेटीसाठीच्यासमोर तयारीचा आढावा घेतला. शुक्रवारी मोदींचा केदारनाथ दौरा आहे.

धामी यांच्यासोबत राज्यमंत्री हरकसिंग रावत आणि सुबोध उनियालही उपस्थित होते. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री धामचे पुजारी त्रिवेंद्र रावत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लागू झालेल्या देवस्थानम बोर्ड कायद्याला विरोध करत आहेत. कायद्यानुसार, चार देवस्थानांशी संबंधित ५१ मंदिरे दोन वर्षांपूर्वी कायद्याद्वारे स्थापन झालेल्या देवस्थानम मंडळाद्वारे नियंत्रित केली जातात.

मंगळवारी केदारनाथ येथे त्यांचे जोरदार स्वागत झाल्याचे सांगून उनियाल म्हणाले, “माझे पुजाऱ्यांनी स्वागत केले आणि ते माझ्यासोबत दर्शनासाठी आले. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आणि आम्ही हे प्रकरण मिटवले. आज मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन ३० नोव्हेंबरपर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.”

हे ही वाचा:

दिवाळी हा अमेरिकेतही राष्ट्रीय उत्सव जाहीर

लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या

पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल

भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट

ते म्हणाले की राज्य सरकार हे ‘पूर्णपणे’ पुरोहित आणि पुजारी यांच्यासोबत आहे. ‘त्यांच्या हिटाची नेहमीच काळजी घेतली जाईल.’

केदारनाथ व्यतिरिक्त, यमनोत्री आणि गंगोत्री येथील बाजारपेठा देखील पुजाऱ्यांना समर्थन देण्यासाठी सोमवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या या राज्यात सत्ताधारी भाजपाला हा मुद्दा संकटात आणू शकत होता. परंतु मुख्यमंत्री धामी यांनी हा मुद्दा निकालात लावून भाजपाचे संकट टाळले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा