29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा'शेल कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी पैसे फिरवले'

‘शेल कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी पैसे फिरवले’

Google News Follow

Related

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या रिमांडमध्ये त्यांच्याविरोधात जे आरोप करण्यात आले आहेत, ते गंभीर स्वरूपाचे आहेत.

अनिल देशमुख यांनी दिल्लीतल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे फिरवले. देशमुख यांनी कुटुंबातील सदस्य आणि इतर ओळखीतल्या लोकांच्या मदतीने पैशांची अफरातफर केली. दिल्लीतल्या शेल कंपनींच्या माध्यमातून त्यांनी त्याच्या नागपुरातल्या साई शिक्षण संस्थेत पैसे डोनेशनच्या नावाखाली फिरवले. आतापर्यंत जो तपास करण्यात आला जी कागदपत्र आमच्या हाती लागली त्यावरून अनिल देशमुख दोषी असल्याचं स्पष्ट होत आहे.

गृहमंत्री असताना देशमुखांनी सचिन वाझेला एका बारकडून ३ लाख वसुलीच टार्गेट दिलं होतं. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान ४ कोटी ७० लाख रुपये जमा करून दिले. वाझेच्या म्हणण्यानुसार बॉस नंबर एक म्हणजे अनिल देशमुखच आहे. आतापर्यंत २७ पेक्षा जास्त कंपन्या अशा आहेत ज्या देशमुख कुटुंबियांकडून चालवल्या जात होत्या.

हे ही वाचा:

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

‘राऊत आणि मलिक स्वतःच महाविकास आघाडीसाठी कबर खोदत आहेत’

तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला

काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात १९ मृत्युमुखी

 

याच प्रकरणात देशमुखांना समन्स पाठवण्यात आली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. अनिल देशमुख चौकशीला हजर झाले मात्र ते तपासात सहकार्य करत नव्हते. ईडीच्या रिमांड अप्लिकेशनमधल्या माहितीनुसार या प्रकरणात १०० कोटींची मनी लाँडरिंग झालं जे शोधून काढायचंय. देशमुखांच्या १४ दिवसांच्या कस्टडीची मागणी ईडीने याच आधारावर केलीय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा