27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणनवाब मलिकांना भोगावे लागणार गंभीर परिणाम

नवाब मलिकांना भोगावे लागणार गंभीर परिणाम

Google News Follow

Related

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक बेछूट आरोप करत असून फडणवीसांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागतील असा घणाघात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्रात संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत.

राज्यात महापूर आला. अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळायची आहे. त्यांना पीक विमा मिळायचा आहे. विशेष जास्त पाऊस नसतानाही पूर का आला, याची अद्याप चौकशी झालेली नाही. कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप चालू आहे आणि २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे शेकड्यांनी वाढले आहेत. अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करणे चालू आहे.

हे ही वाचा:

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल

राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी

निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. पण वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, १ नोव्हेंबर रोजी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. सुधाकर भालेराव उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा