विशेष राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटण्याच्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १० आरोपींपैकी नऊ जणांना दोषी ठरवले. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि ८० जण जखमी झाले होते.
न्यायालयाने या प्रकरणी आज शिक्षा सुनावली असून ज्यामध्ये चार आरोपींना फाशी दिली जाणार आहे, दोघांना जन्मठेपेची आणि दोघांना १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका आरोपीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘हुंकार’ रॅलीत हे स्फोट झाले होते. रॅलीच्या ठिकाणी सहा बॉम्बस्फोट झाले होते, तर दोन बॉम्बस्फोट ज्या व्यासपीठावर मोदींनी भाषण केले त्या व्यासपीठाच्या १५० मीटरच्या आत झाले. शेवटचा बॉम्ब हा १२.२५ वाजता झाला होता. मोदी आणि भाजपचे प्रमुख नेते मंचावर येण्यापूर्वी २० मिनिटे आधी हा स्फोट झाला होता. नंतर घटनास्थळावरून चार जिवंत बॉम्ब सापडले होते.
ही वाचा:
शेळीपालनाचे आमीष दाखवून ‘बकरा’ बनविले!
राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी
पाकिस्तानातील हिंदू मंदिरात लुटालूट
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित भाजपच्या ‘हुंकार’ रॅलीला संबोधित करण्यासाठी पाटण्याला जात होते. मात्र नरेंद्र मोदी पाटण्याला पोहोचण्यापूर्वीच भाजप समर्थकांनी खचाखच भरलेल्या गांधी मैदानावर दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.