पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी- २० शिखर परिषदेसाठी युरोपमध्ये असून इटलीची राजधानी रोम येथे सुरू असलेली जी- २० शिखर परिषद अनेक अर्थाने भारतासाठी यशस्वी ठरली आहे. सरकारी सूत्रांच्या हवालाने ‘न्यूज १८ लोकमत’ने दिलेल्या माहितीनुसार, या शिखर परिषदेत इतर विकसनशील देशांसोबत हवामान आणि ऊर्जा क्षेत्रात काही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत, हे मुद्दे समजावून सांगण्यात भारत यशस्वी ठरला आहे. अहवालानुसार, जी- २० देशांना हवामान बदलाबाबत त्यांच्या जबाबदाऱ्यांवर सक्रियपणे काम करण्यास सांगितले गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जी- २० देशांचे लक्ष शेतकऱ्यांकडे वेधण्यातही भारत यशस्वी ठरला आहे. भारताने या देशांना जी- २० शिखर परिषदेच्या मंचावरून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले असून यासाठी सर्व देशांना वचनबद्ध केले आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी संपविले जीवन
‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’
प्रसिद्ध झाला!! ‘न्यूज डंका’चा पहिलावहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’
जी- २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, ते ग्लासगो बैठकीत हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतील.