गृहमंत्री अमित शहा यांनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय ‘एकता दिवस सेलिब्रेशन’ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. केवडिया येथे झालेल्या या सोहळ्यात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांच्यासह हवाई दलातील अधिकारी, ऑलिम्पिक, आशियाई आणि विविध खेळातील पदक विजेते आदी खेळाडूही सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, सरदार पटेल यांना विसरण्याचा प्रयत्न झाला आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांना योग्य सन्मान मिळाला नाही. मात्र, स्टॅच्यू ऑफ युनिटी संपूर्ण जगाला एक संकेत देते की, भारताची एकता ही कधीही खंडित होऊ शकत नाही.
अमित शहा म्हणाले, आज सरदार पटेल यांची जयंती आहे. मला देशभरातील कोट्यवधी नागरिकांना सांगायचे आहे की युगायुगात एकच व्यक्ती ‘सरदार’ होऊ शकते आणि ते एक सरदार शतकानुशतके आपल्या आठवणीत राहतात. शहा म्हणाले, आज आपण देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा पुढे नेत आहोत.
आज सरदार पटेल की जन्म जयंती है। मैं पूरे देश में करोड़ों देशवासियों को बताना चाहता हूं- 'सदियों में कभी कोई एक ही सरदार बन पाता है, वो एक सरदार सदियों तक अलख जगाता है' :गुजरात के केवड़िया में गृह मंत्री अमित शाह pic.twitter.com/Zdm6ywPmz7
— ANI_HindiNews (@AHindinews) October 31, 2021
गृहमंत्री म्हणाले, आचार्य चाणक्य यांनी देशाला एकसंघ राहण्याची शिकवण दिली होती. शतकांनंतर सरदारांनी देशाला एकत्र केले. यामुळे आज देशाला जगात आपले वेगळे स्थान मिळाले आहे.
हे ही वाचा:
गाणाऱ्या व्हायोलिनचे सूर हरपले; प्रभाकर जोग कालवश
‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’
भोपळा झाला सर्वाधिक मार्कांनी ‘पास’
दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू
ब्रिटिशांसमोर व्यावहारिक बाजूचे नेतृत्व सरदार पटेल यांच्याकडे होते. कोणतीही बाब निष्कलंकपणे मांडणे हे पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात उपजत होते. शहा म्हणाले, सरदार पटेल यांनी दिलेल्या प्रेरणेने आज देशाला आणखी अखंड ठेवण्याचे काम केले आहे. आज त्यांची प्रेरणा आपल्याला एकसंध ठेवण्यात, देशाला पुढे नेण्यात यशस्वी ठरली आहे. केवडिया हे कोणत्याच ठिकाणाचे नाव नसून ते आता एक तीर्थक्षेत्र बनले आहे. अमित शहा म्हणाले, सरदारसाहेबांनी भारताला एकसंध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरदार साहेबांना विसरण्याचा प्रयत्न झाला हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांच्या योगदानाला योग्य ती मान्यता देण्यात आली नाही.