आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने असणार आहेत. दोनही संघांसाठी हा करो या मरो प्रकारचा सामना असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ विजयाला गवसणी घालून महत्वपूर्ण असे २ अंक खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
दुबई येथे सुरु असलेला आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप दिवस गणिक अधिक रंजक होत चालला आहे. रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन तगडे संघ एकेमेकांना भिडणार आहेत. स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील ब गटात हे दोन संघ आहेत. या दोन्ही संघानी आत्तापर्यंत आपला एक एक सामना खेळाला असून त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघानी पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना हा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. आजचा सामना जिंकणाऱ्या संघाची उपांत्य फेरीत जाण्याची संधी अधिक असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाची उपांत्य फेरीची आशा धूसर होणार आहे.
हे ही वाचा:
गाणाऱ्या व्हायोलिनचे सूर हरपले; प्रभाकर जोग कालवश
‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’
‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’
दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू
दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघ काय असणार यावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. भारतीय संघाला एका अतिरिक्त गोलंदाजांची कमतरता जाणवताना दिसत आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा संघात असला तरी तो अद्याप गोलंदाजी करताना दिसलेला नाही. त्यामुळे भारतीय संघात नेमके काय बदल होणार? शार्दूल ठाकूरला संधी मिळणार का? याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे.