लडाखच्या स्टारत्सापु त्सो, त्सो कर या दोन तलावांना रामसार दर्जा मिळाला आहे. याबरोबरच देशातील रामसार दर्जा मिळालेल्या क्षेत्रांची संख्या ४२ झाली.
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, अत्यंत उंचीवरील पाणथळ क्षेत्र म्हणून चांगथांग या लडाखच्या भागातील क्षेत्रांची नोदं झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हे क्षेत्र दोन तलावप्रणालींचे बनले आहे. यात गोड्या पाण्याचा स्टारत्सापुक त्सो आणि खाऱ्या पाण्याचा त्सो कर या तलावांचा समावेश होतो असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले आहे.
मागच्या महिन्यात महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर आणि आग्रा येथील कीथम सरोवराचा देखील या श्रेणीत समावेश झाला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर १९७१ मध्ये निश्चित झालेल्या करारांपैकी एक म्हणजे इराणमधील शहर रामसार येथील त्याच नावाने झालेला करार! पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनाबाबतचा करार आहे.