मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. अखेर २७ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर होऊन त्याची सुटका झाली आहे. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) आर्यन खानचा जामीन मंजूर झाला होता. मात्र कोर्टची ऑर्डर आणि इतर काही कायदेशीर प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे आर्यनला कालची रात्रही तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर आज ११ वाजता आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली आहे.
Mumbai | Aryan Khan arrives at his home 'Mannat' after being released from Arthur Road Jail pic.twitter.com/rgjaVLLDER
— ANI (@ANI) October 30, 2021
आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेल्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आर्यन खानची सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येऊन थेट गाडीत बसून आर्यन खान मन्नतच्या दिशेला रवाना झाला. मन्नतजवळ शाहरुखच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून आर्यनच्या सुटकेनंतर त्यांनी मोठा जल्लोष करत फटाकेही फोडले. आर्यन आणि शाहरुख खानसाठी काही संदेश देणारे फलकही घराजवळ लावण्यात आले होते. काही चाहत्यांनी ढोल ताशे वाजवूनही त्यांचा आनंद व्यक्त केला.
हे ही वाचा:
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
आर्यनला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर काल अभिनेत्री जुही चावला संध्याकाळी चारच्या सुमारास सेशन न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यांनी आर्यन खानच्या जामीनावर गॅरेंटर म्हणून सही केली. यावेळी त्यांच्याबरोबर सतीश मानेशिंदे देखील न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली. आर्यनच्या जामीनाची सर्व कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या पेटीपत्रात पोहोचणे आवश्यक होते. कारण ही पेटी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतच उघडी असते. मात्र उशीर झाल्यामुळे कालची रात्रही आर्यनला तुरुंगातच काढावी लागली होती.
क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.