पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत केंद्राच्या शेतीविषयक कायद्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील, ज्यामुळे प्रामुख्याने पंजाबमधील ‘शेतकरी’ दिल्ली सीमेजवळ आंदोलन करत आहेत. सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आणि शहा यांच्या भेटीची घोषणा केली.
“उद्या मी गृहमंत्री शाह यांना भेटणार आहे आणि माझ्यासोबत २५-३० लोक जातील.” असं ते म्हणाले.
काँग्रेस नेत्याच्या या इशाऱ्याचे भाजपाने स्वागत केले. पक्षाचे सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, “केंद्र शेतकऱ्यांशी चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. गतिरोध दूर करण्यासाठी कोणत्याही मध्यस्तीचे स्वागत केले आहे.
सिंग यांची शहा यांच्याशी होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे. कारण एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की शेतकरी आंदोलनाचा प्रश्न मार्गी लागल्यास ते भाजपाशी युती करतील.
“मला वाटते की मी पंजाबचा मुख्यमंत्री असल्यामुळे आणि एक शेतकरीही असल्यामुळे यावर तोडगा काढण्यात मी मदत करू शकतो.” सिंग काल पत्रकार परिषदेत म्हणाले.
हे ही वाचा:
‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी
“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र
घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’
नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी
भाजपानेही त्यांचा पक्ष काय घोषणा करतो याची वाट पाहणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तथापि, राष्ट्राच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या कोणाशीही युती करण्यास ते तयार असल्याचे भाजपाने सांगितले होते.
दरम्यान, बुधवारी चंदीगडमध्ये माध्यमांना संबोधित करताना अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या राजकीय संघटनेचे नाव सांगितले नाही. परंतु ते म्हणाले की ते पंजाबमधील सर्व ११७ विधानसभा जागांवर आगामी निवडणुका लढवतील.