एनसीबी आणि नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची चौकशी मुंबई पोलीस दलातील चार अधिकारी करणार आहेत. प्रभाकर साईल, सुधा द्विवेदी, कनिष्का जैन, नितीन देशमुख यांनी केलेल्या या तक्रारींवर पोलिस चौकशी करणार आहेत.
सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत कारकर, आणि पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी हे ही चौकशी करणार आहेत. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत पर्यवेक्षक असणार तर पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत सहायक पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही नावे जाहीर केली आहेत.
महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेले काही दिवस सातत्याने एनसीबी विशेषतः एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात वेगवेगळे आरोप करत आहेत. हे आरोप केवळ त्यांच्या क्रूझ प्रकरणातील चौकशीसंदर्भात नाहीत तर वैयक्तिक स्वरूपाचेही आहेत. त्यामुळे त्याविरोधात समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन हिने तक्रार दाखल केली आहे. या सगळ्याची चौकशी हे पोलिस अधिकारी करणार आहेत.
हे ही वाचा:
नवाब मालिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार
चीनच्या नव्या सीमा कायद्यावर भारत नाराज
आव्हाड क्रांति रेडकरना म्हणतात, सांभाळून बोला, इतिहास काढला तर हमाम मे सब नंगे!
नीरज चोप्रासह या ११ जणांना मिळणार खेलरत्न पुरस्कार
समीर वानखेडे यांची चौकशी एनसीबीच्या पाच सदस्यांनीही बुधवारी केली. मात्र त्यात त्यांना काहीही ठोस आढळलेले नाही. त्यामुळे वानखेडे हेच क्रूझ प्रकरणी सुरू असलेल्या तपासात कायम राहणार आहेत. एनसीबीने हे स्पष्ट केले आहे.