एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी केले आवाहन
प्रसारमाध्यमांत येऊन खळबळजनक दावे करणारे कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणातील पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांनी येत्या दोन दिवसांत आमच्याशी संपर्क साधावा आणि जे काही सांगायचे आहे ते निर्भयपणे सांगावे, असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी केले आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह पाचजण सध्या दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. इथे ते समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करणार आहेत.
ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, आम्ही येथील एनसीबी .युनिटला प्रार्थना केली होती की, मुख्य साक्षीदार साईल, गोसावी यांना नोटीस पाठवावी. या दोघांनी आमच्या तपासप्रक्रियेत सामील व्हावे आणि तथ्य सांगावे. पण प्रयत्नांनंतरही त्यांच्याकडे नोटीस पोहोचू शकलेली नाही. आम्ही त्यांच्या घरच्या पत्त्यावर नोटिशी पाठवल्या पण त्याती एकाचे घर बंद होते तर दुसऱ्या साक्षीदाराचा पत्ता चुकीचा होता. मी मीडियातून सांगू इच्छितो की, गोसावी व साईल यांनी आमच्यासमोर यावे. उद्या व परवा त्यांनी सीआरपीएफ मेस बांद्रा येथे यऊन त्येंनी माहिती द्यावी. आम्ही निष्पक्षपणे तपास करू. त्यांनी कोणतेही भय न बाळगता आमच्याशी संवाद साधावा. जे त्यांनी मीडियात सांगितले ते आम्हाला सांगावे.
हे ही वाचा:
नवाब मलिक, न्यायालयात पुरावे सादर करा!
आर्यन खान आजची रात्रही तुरुंगातच काढणार
एक दिवस ‘संपूर्ण काश्मीर’ भारताचा भाग असेल
नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या
आजच्या चौकशीत आम्ही काही दस्तावेज एकत्र केले. महत्त्वाचे कागद प्राप्त केले. समीर वानखेडेंची आम्ही चौकशी केली. जवळपास साडेचार तास ही चौकशी चालली. आवश्यकता असेल तर आणखी कागदपत्र गोळा केली जातील.
मुंबई पोलिसही याची चौकशी करत आहेत. त्याबद्दल विचारल्यावर ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, मुंबई पोलिस त्यांच्या स्तरावर चौकशी करत आहेत पण आम्ही त्यावर काहीही बोलणार नाही.