28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणनवाब मलिक, न्यायालयात पुरावे सादर करा!

नवाब मलिक, न्यायालयात पुरावे सादर करा!

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांनी केले वक्तव्य

एखादे प्रकरण जर न्यायालयात सध्या चालू असेल तर तेथे पुरावे द्यायला हवे. संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तीने संविधानाची शपथ घेतलेली असते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात पुरावे दिले पाहिजे. राहिला प्रश्न समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांचा, तर त्याची चौकशी एनसीबी करतेच आहे!, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या आरोपांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, कोणत्याही अधिकाऱ्याला लक्ष्य करणे योग्य नाही. कोणत्याही केसमध्ये साक्षीदार असतो त्याच्यावर दबाव आणता येत नाही. सरकारतर्फे तर असा दबाव आणणे योग्य नसते. सरकारी यंत्रणेचा वापर करणेही योग्य नाही. ही सगळी परिस्थिती न्यायप्रक्रियेत बाधा आणणारी आहे. नवाब मलिक हे ते मंत्री आहेत. संविधानाची त्यांनी शपथ घेतली आहे. मी अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकीन, त्याची नोकरी घालविन असे मंत्र्याने केलेले वक्तव्य संविधानाच्या शपथेच्या मर्यादेत बसत नाही. नवाब मलिकांनी कोर्टात जावे. सर्व पुरावे द्यावे. पण इथे तर नवाब मलिक हे राजकारण करत आहेत. मी म्हणेन की, समीर वानखेडे यांच्यावर जे आरोप आहेत, त्याची चौकशी एनसीबी करत आहे. त्यातून दूध का दूध, पानी का पानी होईलच. त्यावर राजकारण नको.

 

हे ही वाचा:

ज्ञानदेव आणि अज्ञान देव….

एक दिवस ‘संपूर्ण काश्मीर’ भारताचा भाग असेल

‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’

नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या

 

नवाब मलिक हे गेले काही दिवस एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. आता हे आरोप वैयक्तिक स्वरूपाचे झाले आहेत. त्यावरून मलिक हे रोज नव्याने खळबळ उडवत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा