मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या क्रूझ जहाजातून ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी जामीन सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली. ज्येष्ठ वकील अली काशिफ खान देशमुख आणि वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने उद्या दुपारी २:३० वाजेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आरोप केल्यानुसार, अरबाजची बाजू मांडताना देसाई यांनी कट रचण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले. “जर एकाच उद्देशासाठी तीन असंबद्ध व्यक्ती येत असतील तर ते षड्यंत्र नाही.” असे त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाला सांगितले. व्हॉट्सऍप चॅटचा मुंबई क्रूझशी संबंध नसल्याच्या आर्यनच्या बाबतीत केलेल्या युक्तिवादाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मंगळवारी, त्याने असा युक्तिवाद केला होता की आर्यन आणि एक मित्र यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्सचा एनसीबीकडून ड्रग्सचा ‘चुकीचा अर्थ’ लावला जात आहे. त्यांचा हा संवाद ऑनलाइन पोकरबद्दल सुरु होता, असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या
‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’
फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट
आर्यनच्या वतीने वरिष्ठ वकील आणि भारताचे माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मंगळवारी आपला युक्तिवाद पूर्ण केला. रोहतगी यांनी आर्यन खानच्या अटकेला ‘मनमानी’ म्हटले आहे. एनसीबीला आर्यन खानकडून कोणतेही बेकायदेशीर पदार्थ मिळालेले नाहीत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन दर्शविण्यासाठी वैद्यकीय तपासणी केलेली नाही.
आर्यन २ ऑक्टोबरपासून कोठडीत आहे, जेव्हा त्याला क्रूझ जहाजावरील रेव्ह पार्टीवेळी ताब्यात घेण्यात आले होते.