27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणपंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी "कर्मयोगी नमो!" लघुपट स्पर्धा

पंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी “कर्मयोगी नमो!” लघुपट स्पर्धा

Google News Follow

Related

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वसंपन्न कारकीर्दीवर आधारित “कर्मयोगी नमो!”या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली आहे.

भाजपाच्या “सेवा आणि समर्पण” अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “कर्मयोगी नमो!” ही लघुपट स्पर्धा नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर आधारित असेल. एक मिनिट ते बारा मिनिटांच्या या लघुपटासाठी भाषेचे बंधन नाही. या स्पर्धेसाठी प्रथम रु.७५ हजार, द्वितीय  रु.५१ हजार  तृतीय रु. ३१ हजार तर पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.१५ हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. गोजमगुंडे यांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केले.

हे ही वाचा:

‘मला कुणी दाऊद हाक मारत असेलही, पण मी मागासवर्गीयच आहे’

माझा पक्ष भाजपाशी युती करणार

‘नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ’

फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट

 

“कर्मयोगी नमो!” लघुपट स्पर्धा विनाशुल्क असून अधिक माहितीसाठी namokarmayogi@gmail.com या इमेलवर तसंच स्पर्धा आयोजक संचित यादव 9870467860 या क्रमांकावर,तर मुंबई प्रदेश संयोजक मकरंद पाध्ये यांच्याशी 9920564278 व्हाट्स ॲपवर संपर्क साधावा, असं आवाहन भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठनं केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला २० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून २००१ ते २०१३ आणि नंतर पंतप्रधान पदाची सात वर्षांची यशस्वी कारकीर्द असा त्यांचा २० वर्षांचा देदिप्यमान प्रवास आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभर केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा