सुपारी खाणे हा कोकणी माणसासाठी दैनंदिन बाब, पण हीच सुपारी जीवावर बेतेल याचा कोणी विचारही केला नसेल. पण अशीच एक घटना कोकणातून पुढे आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एका महिलेने सुपारी म्हणून अडकित्त्याने गावठी बॉम्ब फोडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेत भयंकर असा स्फोट झाला असून महिलेला तिचे हाताचे बोट गमवावे लागले आहे.
लक्ष्मी सखाराम देवळी असे या प्रकरणातील जखमी महिलेचे नाव आहे. त्या साठ वर्षांच्या आहेत. पिडीत लक्ष्मी देवळी या सांवतवाडी येथील ओटवणे या गावच्या रहिवासी आहेत. रविवार, २४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी देवळी या आपल्या राहत्या घरी होत्या. सुपारी खाण्यासाठी म्हणून त्यांनी अडकित्ता हाती घेत सुपारी फोडण्याचा प्रयत्न केला. पण ती सुपारी नव्हती. तो सुपारी सदृश्य गावठी बॉम्ब होता.
हे ही वाचा:
वानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
मुंबईतून २४ किलो चरस जप्त; चार आरोपींना अटक
अडकित्ता्याचा घात झाल्यावर हा बॉम्ब फुटला. या स्फोटाच्या आवाजाने शेजारचे लोक जमा झाले. या स्फोटामुळे लक्ष्मी देवळी जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात लक्ष्मी देवळी यांना त्यांच्या हाताचे एक बोट गमवावे लागले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या विषयात तपास सुरु केला आहे. या महिलेकडे हा सुपारी सदृश्य बॉम्ब आला कुठून ही बाब अद्यापही समोर आलेली नाही.