बेंगळुरू विमानतळावर मंगळवारी एक वेगळीच घटना घडली. ती घटना व्हीडिओच्या रूपात सगळीकडे व्हायरल झाली आणि सगळ्यांना त्या घटनेचे खूप कौतुक वाटले.
बेंगळुरूच्या विमानतळाबाहेर पोलिसांची एक गाडी उभी होती. त्या गाडीच्या टपातून त्या गाडीतील एक अधिकारी बाहेर बघत संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होता. तेवढ्यात तिथे एक लहान मुलगा आपल्या वडिलांसह आला. त्या गाडीचा रंग, पोलिसांची गाडी पाहून त्या मुलामधील कुतुहल जागृत झाले. त्याने वर बघितल्यावर त्याला तो अधिकारी टपावर उभा असल्याचे दिसले. त्या मुलाने लागलीच त्या गाडीच्या दिशेने उभे राहात त्या अधिकाऱ्याला सॅल्युट केला. त्या मुलाचे वडीलही त्याच्याकडे कौतुकाने पाहात होते. त्या अधिकाऱ्यालाही या मुलाचे कौतुक वाटले त्यानेही त्या मुलाला लागलीच सॅल्युट ठोकला.
हे ही वाचा:
आर्यनच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात गोंधळ
… म्हणून त्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव!
वानखेडे ड्रग्जवाल्यांवर कारवाई केलीत, आता भोगा…
भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
हा व्हीडिओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मुलाचे ते निरागस भाव सोशल मीडियावरील सगळ्यांना पसंत पडले. जयहिंद असे म्हणत अनेकांनी त्या व्हीडिओवर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. लेखिका शेफाली वैद्य यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.
Apparently, this happened at Bangalore airport. A spontaneous gesture by a kid. The best video I have seen today. Watched it on loop. pic.twitter.com/0R39pAOgiG
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) October 26, 2021