28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषपाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

Google News Follow

Related

राजस्थानमधील उदयपूर येथील एका खासगी शाळेमधील शिक्षिकेने आपली नोकरी एका व्हॉट्सऍपच्या स्टेटसवर ठेवलेल्या फोटोमुळे गमावली आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यानंतर या शिक्षिकेने व्हॉट्सऍप पाकिस्तानच्या विजयाबद्दल एक स्टेटस ठेवले होते. त्यामुळे तिला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले.

नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव नफीसा अटारी असे आहे. नफीसा या उदयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर नफीसा यांनी स्टेटसवर टीव्हीवर सामना पाहतानाच फोटो ठेवला होता. या फोटोला त्यांनी ‘जीत गये… वी वॉन’ असे कॅप्शन दिले होते. या फोटोमध्ये रिझवान आणि बाबर आझमचा फोटो दिसत आहे.

हे ही वाचा:

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

धक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

पाकिस्तानने ३५० दहशतवादी मोकाट सोडले

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी शाळेने त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचे पत्रक जारी केले आहे. नीरजा मोदी स्कूलच्या शिक्षिका नफीसा अटारी यांना सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार नीरजा मोदी स्कूलमधून तत्काळ स्वरुपाने नोकरीवरुन काढून टाकण्यात येत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रावर चेअरमनची स्वाक्षरीही आहे.

नफीसा यांनी ठेवलेल्या या स्टेटसवर एका विद्यार्थ्याच्या पालकांनी रिप्लाय करुन तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देताय का असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले होते. त्यानंतर नफीसा यांनी ठेवलेल्या स्टेटसचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला आणि ही शाळा चालवणाऱ्या ट्रस्टच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत नफीसा यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा