24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाकुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

Google News Follow

Related

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरण सध्या देशभर चांगलेच गाजत असून या प्रकरणात रोज नवनवीन गौप्य्स्फोट होताना दिसत आहेत. अशातच रविवार ३४ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात कुणाल जानी हे आणखीन एक नाव पुढे आले आहे. सोशल मीडियावर सध्या या नावाची चांगलीच चर्चा असून कुणाल जानी हा कलानगरमध्ये राहणाऱ्या ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचा निकटवर्तीय आहे असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपचे महाराष्ट्र सचिव नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.

रविवारी एकीकडे जगभर भारत विरुद्ध पाकिस्तन सामन्याचा उत्साह पहिला मिळत असतानाच महाराष्ट्रात मात्र आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणावरून राजकीय सामना पाहायला मिळाला. रविवारी या क्समधील एका साक्षीदाराने एनसीबीवर आरोप करताना असे म्हटले की एनसीबीने शाहरुख खानकडे पैसे मागितले. त्यामुळे या आरोपानांनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते चांगलेच सक्रिय झाले. यावेळी संजय राऊत यांनी एनसीबीच्या कार्यालयातील एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर खात्यावर टाकला.

हे ही वाचा:

प्रभाकर साईलने त्याचे म्हणणे कोर्टात मांडावे

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

हा व्हिडीओ बघून भाजपा नेते मोहित कंबोज यांनी पलटवार केला. संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये के.पी. गोसावी यांच्यामागे एक तरूण दिसत आहे. हा तरुण कोण आहे? याचे कुठल्या पक्षाशी लागेबांधे आहेत? कोणत्या राजकीय नेत्याशी हा संबंधित आहे, असे प्रश्न मोहित कंबोज यांनी उपस्थित केले आहेत. तर नंतर त्यांनी कुणाल जानी याचे शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि राज्य सरकारमधील एका मंत्र्यांचा कुणाल जानी हा खास मित्र असल्याचेही म्हटले आहे.

तर हीच री पुढे ओढत भाजप सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी कुणाल जानी हा कलानगर मधील एका मंत्र्यांचा जवळचा असल्याचे ट्विट केले आहे. “कुणाल जानी ठाकरे सरकारच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या जवळचा आहे, मंत्री कलानगरचा असल्यामुळे वेगळ सांगायची गरज नाही. जानीच्या हॉटेलवर पेंग्विन व गॅंग मजा मारते.” असे ट्विट राणे यांनी केले आहे. त्यामुळे कलानगरचा हा मंत्री नेमका कोण? असा प्रश्न राज्याच्या जनतेला पडला आहे.

कुणाल जानी आहे तरी कोण?
कुणाल जानी हा मुंबई मधील एक प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असून त्याची राजकारण आणि बॉलिवूड मधील मोठमोठया लोकांसोबत उठबस असल्याचे म्हटले जाते. या आधी गेल्या वर्षी घडलेल्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या वेळ कुणाल जानी याला अटक करण्यात आली असून त्याचे रिया चक्रवर्ती सोबतचे संभाषण समोर आले होते, ज्यामध्ये ते ड्रग्सविषयी बातचीत करत होते. या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली असून सद्ध्या कुणाल जानी हा जामिनावर बाहेर आहे.

त्यामुळे आर्यन खान प्रकरणात आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे हा विषय कुठपर्यंत जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर कुणाल जानीमुळे या प्रकरणात आणखीन काही नावे पुढे येतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनसीबीने अद्याप या कुणाल जानी विषयी कोणत्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा