भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई भाजपाचे सचिव प्रतिक कर्पे यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या संमतीने ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण यांनी शनिवार, २३ ऑक्टोबर रोजी ही कार्यकारणी सदस्यांची यादी जाहीर केली आहे.
या वेळी देशभरातून एकूण ४२ जणांची कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर १५ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या कार्यकारणी सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील तिघा जणांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रतिक कर्पे यांच्या सह गजानन घुगे आणि संगीता खोत यांच्याही नावांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
तोंडोळी घटनेतील दोन नराधमांना ठोकल्या बेड्या
इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट
३४ मतदारांच्या निवडणुकीत आज शरद पवार-धनंजय शिंदे लढत
इस्लामचा त्याग करून इंडोनेशियाच्या राजपुत्री करणार हिंदुधर्मात प्रवेश! वाचा सविस्तर…
नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हेतूनेच या कार्यकारणीत भाजपा मुंबई सचिव प्रतिक कर्पे यांची निवड करण्यात आली आहे. कर्पे हे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असून ते मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य देखील आहेत. त्याप्रसंगी प्रतिक कर्पे म्हणाले की, आज भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी माझी निवड करण्यात आली. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावीन, तसेच पक्षाने आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून ते नागरिकांपर्यत पोहचवत पक्ष बळकटीसाठी व राष्ट्रीय विचारधारेसाठी , हिंदूत्वासाठी सदैव तत्पर असेन असा विश्वास प्रतिक कर्पे यांनी व्यक्त केला आहे.