24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानमध्ये का सुरु आहेत दंगली?

पाकिस्तानमध्ये का सुरु आहेत दंगली?

Google News Follow

Related

कट्टरपंथी इस्लामिक पक्षाच्या समर्थकांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी किमान दोन पाकिस्तानी पोलिस ठार झाले आहेत. या संघटनेने यापूर्वी फ्रेंच राजदूताला हद्दपार करण्याची मागणी केली होती.

लाहोरच्या पूर्वेकडील शहरात हजारपेक्षा जास्त लोक जमले, रस्ते अडवले आणि तेहरिक-ए-लब्बाईक पाकिस्तानचे नेते साद रिझवी यांच्या सुटकेची मागणी केली.

रिझवीला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती, जेव्हा पाकिस्तान सरकारने फ्रान्सविरोधी हिंसक निदर्शनांना प्रतिसाद म्हणून पक्षाला बेकायदेशीर ठरवले होते.

लाहोर पोलिसांचे प्रवक्ते राणा आरिफ यांनी एएफपीला सांगितले की, “दोन पोलिस हवालदार आज कामावर असताना चकमकीत ठार झाले.”

दुसरा पोलीस अधिकारी मजहर हुसैन याने सांगितले की, “आंदोलकांनी निषेध करताना पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. जमावाने लाठ्या-काठ्याही वापरल्या आणि पोलिसांवर दगडफेकही केली.”

टीएलपीने म्हटले आहे की ते त्यांच्या नेत्याची सुटका होईपर्यंत आंदोलन संपवणार नाही किंवा ते सरकारशी चर्चाही करणार नाहीत. समर्थकांनी घोळक्यांमध्ये राजधानी इस्लामाबादच्या दिशेने जाण्याची धमकी दिली आहे, जिथे पोलिसांनी शिपिंग कंटेनरसह रस्ते बंद केले आहेत.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रेषित मोहम्मद यांची व्यंगचित्रे पुन्हा प्रकाशित करण्याच्या व्यंगात्मक मासिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण केल्यापासून टीएलपीने फ्रान्सविरोधी मोहीम छेडली आहे.

एप्रिलमध्ये टीएलपीने अनेक दिवस रॅली काढल्याने रस्ते ठप्प झाले होते. तेव्हा सहा पोलिस अधिकारी ठार झाले होते. यामुळे फ्रेंच दूतावासाने आपल्या सर्व नागरिकांना देश सोडण्याची शिफारस केली होती.

हे ही वाचा:

वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल चकमकीच्या आठवणी झाल्या ताज्या

मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त

अखेर फैजाबाद स्थानकही बनले अयोध्या

‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च

या गटाला यापूर्वी मुख्य प्रवाहातील धार्मिक गटांकडून व्यापक पाठिंबा मिळाला आहे. ज्यामुळे पक्षावर कारवाई करण्याच्या सरकारी प्रयत्नांना यश मिळालेलले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा